आनंदी आनंद गडे,
इकडे तिकडे चोहिकडे

वरती खाली मोद भरे,
वायूसंगे मोद फिरे
नभात भरला, दिशात फिरला, जगात उरला
मोद विहरतो चोहिकडे

सूर्यकिरण सोनेरी हे,
कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने,
आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे तिकडे चोहिकडे

बालकवी