By तजस्विनी प्र. राऊत (BODH IAS Accadamy, pune)

रात्र जरी आहे आज काळी
उद्या सुर्य उगवणार आहे
उगवला सूर्य म्हणूनी गर्व नको
सायंकाळी तो पुन्हा मावळणार आहे….

यशपयशाचा खेळ इथे
संपणार थोडीच आहे
म्हणूनी स्वप्न ठेव जिते तुझे
माघार समज मोडीत आहे…

जिंकणे ऊर्जा देत असली
तरी हरणे हा अनुभव देई
प्रयत्नास तोड ठेवूच नको
जिंकण्यास तुझी किनव येई…

तूच तुझ्या जीवनाचा लेखक
बदलाव तूच घडवणार आहे
मी जरी शिल्पकार झाले
तरी घाव तूच सोसणार आहे…

हरु नकोस घाव मिळेल म्हणून
उद्या तुच पुजनार आहे
हरला असेल तर उठ पुन्हा
कारण तूच तुला मडवणार आहे…..
तूच तुला मडवणार आहे….