अफजल्याला फाडून

उभा चिरून…

निघाला शेर शिवबा
स्वराज्य विस्ताराला
अद्दल घडली विजापूरला
यवन मातीत गाडला
संपवले अत्याचाराला
वंदून आई भवानीला
मिठीत नृसिंह गेला
दगा दिसताच सावध झाला
कोतळ्यात खंजीर खुपसला
बोकडाचा बळी चढवला
अफजल्या धरणी पडला
अवघा मराठा पेटून उठला
हजारो हत्तींच बळ अंगाला
हर हर महादेव गरजला
ललकारीत रणी धावला
शत्रूचा फडशा उडविला
सार्थ केलं स्वराज्याला
वादळ उठलं जावळी खोऱ्याला
जिंकून मुलुख घेतला
पन्हाळ्यास आपला केला
मुक्त केलं गोर गरीबाला
आनंद झाला रयतेला
मराठ्यांचा राजा अवतरला
स्वराज्याचा वाली आला
जिंकून यवनी संकटाला
शिवशाहीचा विजय झाला.

कवी – गणेश पावले