नेहमीच !

तू समुद्र निर्विकार नेहमीच!

मी तरंग ! मी तुषार नेहमीच !

काय हे खरेखुरे असेल प्रेम ?

भेटती दुकानदार नेहमीच !

चांदण्याविना कुणी न अंगणात .

वाजते लबाड दार नेहमीच !

प्रश्न मी विचारले दिशेदिशेस

येत राहिले नकार नेहमीच!

लाख टाळले तरी टळे न भेट, भेटतो तुझा विचार नेहमीच !

तू जपून बोलतेस वागतेस

मी निरभ्र आरपार नेहमीच !

गुंजते अजूनही कधी … निवांत

ही नसे मुकी सतार नेहमीच ।