जरी अफवांचे फुटले फवारे
मना तू मुळी डगमगू नको
होतील आरोप फसवे तुझ्यावर
मना तू मुळी तगमगू नको

तू चाल एकटा कशाला सोबती
खरा दोस्त सावली होईल तुझा
तू रोख वार अन् हो तू ढाल
खरा दोस्त वार झेलील तुझा

कधी जिंकशील, कधी हारशील
मना तू मुळी.. अडखळू नको
जातील हे ही.. दिवस बिकट
मना तू मुळी.. डळमळू नको

तू अंश शूर, नको बनू क्रूर
लुबाडून साम्राज्य घडवू नको
भले सोबतीला.. राहील भूक
अहंकारे चूक.. दडवू नको

मना पुण्य थोर केलेस जाण..
खोटे कुणाचे गिरवू नको
असे सत्य तुझ्या, उभे दावणीला
असत्यास डोई मिरवू नको

गणेश पावले, भुईबावडा