मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नुकतेच इंस्टाग्रामवर लाल साडीतील फोटोशूट शेअर केले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नुकतेच इंस्टाग्रामवर लाल साडीतील फोटोशूट शेअर केले आहे.
अमृताने लाल साडीसोबत हिरवा चुडा, केसात गजरा, गळ्यात नेकलेस घालून तिच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत.
लाल साडीत अमृता खूपच सुंदर दिसते आहे.
अमृता खानविलकरच्या या लाल साडीतील फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.
तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
अमृता वेस्टर्न आउटफिट इतकीच पारंपारिक वेशातही तितकीच ग्लॅमरस दिसते आहे.
अमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा वेल डन बेबी चित्रपट रिलीज झाला आहे.
यात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत आहेत.
याशिवाय ती पॉंडीचेरी या मराठी चित्रपटात दिसणार आहे.
अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.
मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे.
राजी’, ‘सत्यमेव जयते’ , ‘मलंग’ अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत.