ऐश्वर्या नारकर म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री.
ऐश्वर्या नारकर म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री.
ऐश्वर्या नारकर यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. पण त्यांच्या अभिनयाइतकीच त्यांच्या सौंदर्याचीही चर्चा होते.
ऐश्वर्या यांच्या सौंदर्यावर चाहते अक्षरश: फिदा आहेत. त्यांच्या चेह-यावरचे निखळ हास्य तर अक्षरश: वेड लावते.
ऐश्वर्या यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपट आणि मालिकांतून त्यांनी आपली अभिनयाची जादू दाखवली आहे.
सध्या त्या सोनी मराठी वरील ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेत काम करत आहेत.
श्रीमंताघरची सूनमध्ये ऐश्वर्या या सासूची म्हणजेच अरुणा ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. त्यांचे हे पात्र प्रेक्षकांना चांगलच पसंत पडत आहे.
विशेष म्हणजे या मालिकेत त्यांचे पती अविनाश नारकर हेही त्यांच्यासोबत आहेत.
ऐश्वर्या सोशल मीडियावरही चांगल्याच अ‍ॅक्टिव्ह आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांचे अनेक फोटो पाहायला मिळतात. सध्या त्यांचे असेच काही फोटो चर्चेत आहेत.
साडीमध्ये ऐश्वर्या कमालीच्या सुंदर दिसतात. पण वेस्टर्न ड्रेसमधील त्यांचे काही फोटोही लक्ष वेधून घेतात.