मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आशुतोषने नांदेड येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आशुतोषने नांदेड येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 

अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवरा आशुतोष भाकरे याने नांदेड येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्ये मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मात्र या घटनेमुळे मयुरी देशमुखच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.

आशुतोषने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटात काम केलं आहे.

आशुतोष आणि मयुरी देशमुख 21 जानेवारी 2016 रोजी लग्नबंधनात अडकले होते.

मयुरी देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती खुलता कळी खुलेना या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाली.

तसेच मयुरी लिखित व दिग्दर्शित नाटक ‘डिअर आजो’ला खूप लोकप्रियता मिळवली. तिचे तिसरे बादशहा हम हे नाटक सुरु होते.

याशिवाय डॉ. प्रकाश बाबा आमटे, 31 दिवस या चित्रपटात तिने काम केले आहे.