मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे.
मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे.
मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.
काही महिन्यापूर्वी नेहाने लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली आहे.
सोशल मीडियावर नेहा नेहमीच अॅक्टिव्ह असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते.
तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करते.
नेहा आपले वर्कआऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करत असते.
नेहा जून चित्रपटात झळकणार आहे.
या चित्रपटात नेहासोबत अभिनेता सिद्धार्थ मेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
या दोघांव्यतिरिक्त किरण करमरकर व रेशम हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.