कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे. प्रार्थना सोशल मीडियावर सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. नुकतेच प्रार्थनाने लाल रंगाच्या साडीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या साडीत तिने कानात झुमके, गळ्यात हार परिधान केला आहे. प्रार्थना या साडीत खूप सुंदर दिसते आहे. प्रार्थना बेहरेच्या या साडीतील फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतो आहे. प्रार्थना बेहरे नुकतेच आगामी चित्रपट छूमंतरचे लंडनमध्ये शूटिंग करून भारतात परतली आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थनासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी, ऋषी सक्सेना आणि श्रीनिवास पोकळे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. No Text एथनिक ड्रेसमध्ये प्रार्थना बेहरेने केले स्टायलिश फोटोशूट, पाहा तिचे ग्लॅमरस फोटोअभिनेत्री प्रार्थना बेहरे सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला रवाना, जाणून घ्या याबद्दलप्रार्थना बेहरेचा बॅकलेस फोटो पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड, पहा तिचे ग्लॅमरस फोटो