स्वप्न घेऊन मुंबईत आली अन्… ! मराठीतील रांगडी अभिनेत्री स्मिता तांबेबद्दल बरंच काही…!!

‘द सेक्रेड गेम्स 2’,‘माय नेम इज शीला’ सारख्या वेबसीरिज असो किंवा मग ‘पंगा’सारखा हिंदी चित्रपट वा जोगवा, तुकाराम, देऊळ यासारखे मराठी सिनेमे अभिनेत्री स्मिता तांबेने या सर्व भूमिकांमध्ये अक्षरश: जीव ओतला.

साता-यात जन्मलेली स्मिता अभिनेत्री होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आली आणि अपार कष्ट, चिकाटी व ध्यासाने तिने हे स्वप्न पूर्ण केले.

11 मे 1983 रोजी साता-यात स्मिताचा जन्म झाला. पुण्यात ती लहानाची मोठी झाली आणि मुंबईने तिला ओळख दिली.

मराठी चित्रपटसृष्टीत स्मिताने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीच. पण बॉलिवूडमध्येही तिने स्वत:ची भक्कम जागा निर्माण केली.

सिंघम रिर्टन्स, रुख, नूर, डबल गेम आणि पंगा अशा अनेक बॉलिवूड सिनेमात तिने विविधांगी भूमिका साकारल्या.

2009 मध्ये तिने ‘जोगवा’ हा सिनेमा साकारला. या सिनेमातील तिच्या अभिनयाचे कौतुक करताना आजही प्रेक्षक थकत नाहीत.

सेक्रेड गेम्स आणि माय नेम इज शीला या वेबसीरिजमधील तिच्या अभिनयावरही लोक फिदा झालेत.

अभिनयात जम बसवल्यानंतर स्मिता निर्मिती क्षेत्रात उतरली. रिंगींग रेन या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून पुढे दिग्दर्शनातही तिने हात आजमावला.

स्मिताने अनेक मराठी शॉर्ट फिल्म्सचे दिग्दर्शन केले. अनेक बालचित्रपटही साकारले.

2019 मध्ये स्मिताने वीरेन्द्र द्विवेदीसोबत लग्नगाठ बांधली. विरेंन्द्र हा नाट्य कलाकार आहे.