मराठमोळी अभिनेत्री वनिता खरातने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली होती. वनिताच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.
मराठमोळी अभिनेत्री वनिता खरातने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली होती. वनिताच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.
पुन्हा एकदा वनिताने बोल्ड फोटो शेअर केला आहे.
वनिता खरातने या फोटोत कलरफुल जॅकेट परिधान केले आहे आणि गळ्यात मोठी चेन घातली आहे.
या फोटोत वनिता ग्लॅमरस दिसते आहे.
वनिताचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना भावतो आहे.
वनिताने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला बोल्ड फोटो पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. पण अशाप्रकारचे फोटोशूट करण्यामागे एक खास कारण असल्याचे तिने तिच्या पोस्टद्वारे सांगितले होते.
तिने या फोटोद्वारे एक महत्त्वाचा विषय मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे तिने पोस्टसोबत लिहिले होते. आपल्या वजनाचा न्यूनगंड कुठेही न बाळगता वनिता खरातने हा फोटो शेअर केला असल्याने तिचे सर्वत्र कौतुक झाले.
वनिता खरातच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने कबीर सिंग चित्रपटात मोलकरणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील ती मोलकरीण केवळ काहीच दृश्यांसाठी असली तरी ही मोलकरीण प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली होती.
याशिवाय ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमध्ये देखील पहायला मिळते आहे.
वनिता खरातचे इंस्टाग्रामवर ४३ हजारांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.
वनिताने नाटकातही काम केले आहे.