अभिनेत्री अक्षया देवधर हिची 'तुझ्यात जीव रंगला' ही पहिलीच मालिका असून पाठक बाई म्हणून तिने या मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे.
अभिनेत्री अक्षया देवधर हिची ‘तुझ्यात जीव रंगला’ ही पहिलीच मालिका असून पाठक बाई म्हणून तिने या मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे.
मालिकेत अक्षया रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते. त्यामुळे अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली.
अक्षया सोशल मीडियावरही बरीच एक्टिव्ह असते.
आपले फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.
सुंदर आणि सालस अशा ‘पाठक बाईंना’ खऱ्या आयुष्यात पारंपारिकपणे तयार होऊन, दागिने घालून नटायची खूप आवड आहे.
आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ती फॅन्सना देत असते.
अक्षयाला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोईंग आहे.