मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले. अंकुशची पत्नी दिपा परब-चौधरी ही देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले. अंकुशची पत्नी दिपा परब-चौधरी ही देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री दीपा परब-चौधरी स्टार प्लस वाहिनीवरील शौर्य और अनोखी की कहानी मालिकेत पहायला मिळते आहे.
या मालिकेतील दीपाच्या कामाचे सगळीकडे खूप कौतूक होत आहे.
बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर दीपाने अभिनय क्षेत्रात कमबॅक केले आहे.
दिपा लग्नानंतर खूपच कमी चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते.
शेवटची ती अंड्याचा फंडा या चित्रपटात झळकली होती.
अंकुश आणि दिपाने २००७ साली लग्न केले. ते दोघे त्यांच्या संसारात प्रचंड खूश असून त्यांना प्रिन्स नावाचा मुलगा देखील आहे.
केदार शिंदेच्या ऑल द बेस्ट या नाटकात अंकुश आणि दिपाने एकत्र काम देखील केले आहे. त्यानंतर दिपा परब आपल्याला अनेक जाहिरातींमधून आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
‘थोडी ख़ुशी थोडा गम’, ‘छोटी मॉ’, ‘मित’ आणि ‘रेत’ यासारख्या हिंदी मालिकेत ती झळकली आहे.