अभिनयाची आवड जपत मिळालेल्या संधीच सोनं करत युवा अभिनेत्री प्राजक्ता शिंदे सध्या चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पहात आहे.
प्राजक्ता शिंदे ‘इमेल फिमेल’ चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करत आहे.
ती या चित्रपटात अत्यंत बोल्ड अंदाजात दिसणार असून या चित्रपटातील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
‘इमेल फिमेल’ चित्रपटाच्या पोस्टरवरील तिच्या या बोल्ड फोटोची चांगलीच चर्चा रंगली होती.
‘इमेल फिमेल’मधील आपल्या भूमिकेबद्दल बद्दल प्राजक्ता म्हणाली, ‘मी ह्यामध्ये मोनिका या मॉडर्न मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे’. यात माझा बिनधास्त आणि बोल्ड अंदाज रसिकांना पहायला मिळणार आहे.
हल्ली सोशल मिडीयाचे व्यसनच जणू सगळ्यांना लागल्याचं चित्र आहे. चुकीच्या मार्गाने एखाद्याला जाळ्यात ओढलंही जाऊ शकतं आणि त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे.
प्राजक्ताला बोल्ड, ग्लॅमरस अंदाजात रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ती फक्त चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड आणि सेक्सी आहे.
प्राजक्ताने इंस्टाग्रामवर बोल्ड फोटोज शेअर केले आहेत.
बिकनी आणि इतर आऊटफिटमध्ये ती क्लीवेज शोऑफ करताना दिसते आहे.