आस्ताद काळे व अभिनेत्री स्वप्नाली पाटील
आस्ताद काळे व अभिनेत्री स्वप्नाली पाटील
मराठी अभिनेत्री स्वप्नाली पाटीलचा आज वाढदिवस आहे. तिच्या बर्थडे निमित्त जाणून घेऊया तिची आणि आस्ताद काळेची लव्हस्टोरी.
अनेक वर्षांपूर्वी एका मालिकेचा पायलट एपिसोड शूट करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात आस्ताद आणि स्वप्नाली दोघे भाऊ-बहीण होते
या मालिकेत स्वप्नालीची एंट्री झाल्यानंतर या दोघांची मैत्री झाली आणि काहीच महिन्यात आस्ताद स्वप्नालीच्या प्रेमात पडला.
आस्तादने स्वप्नालीला प्रपोज केले नाही. मात्र मनात काय आहे हे बोललेच पाहिजे असा त्याचा स्वभाव आहे
त्यामुळे स्वप्नालीला त्याने तू मला आवडतेस असे सांगितले. त्यावर या गोष्टीचा विचार करू दे असे उत्तर स्वप्नालीने त्याला दिलं आणि जवळजवळ वर्षभरानंतर होकार कळवला होता.
आस्तादने त्याच्या प्रेमाची कबुली बिग बॉस मराठीत दिली, त्यावेळी स्वप्नाली तिच्या कुटुंबियांसोबत हा कार्यक्रम पाहात होती
यावर तिच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया काय होती यावर स्वप्नाली सांगते, मी आणि आस्ताद हे चांगले मित्रमैत्रीण असल्याचे माझ्या घरातल्यांना माहीत होते.
पण मैत्रीपेक्षा आमच्यात अधिक काही आहे याची कल्पना माझ्या आई व वडिलांना नव्हती.
माझ्या आईला थोडासा संशय होता. पण वडिलांना काहीच माहीत नव्हते.
बिग बॉस मराठी कार्यक्रमात माझ्याविषयी बोलेल याची मला थोडीदेखील कल्पना नव्हती.
त्याने कार्यक्रमात कबूल केल्यानंतर माझ्या वडिलांनी फक्त माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिले आणि बोलव आता त्याला भेटायला असे ते म्हणाले….