शिव दिनविशेष: शिवाजी महाराजांचा काळातील विशेष तारखा व त्याची माहिती
१३ ऑगस्ट १६५७: शाहजी राजांच्या सुटकेनिमित्त दिलेला सिंहगड मराठ्यांनी विजापूरकरांच्या ताब्यातून पुन्हा जिंकून घेतला.
१४ ऑगस्ट १६५७: रघुनाथ बल्लाळ अत्रे यांनी दंडाराजपुरी जिंकली. जंजिरा जिंकण्याचा पहिला प्रयत्न फसला.
१५ ऑगस्ट १६६०: शाईस्तेखानाने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला.
१६ ऑगस्ट १६६२: अनाजी दत्तो प्रभुणीकर हे वाकनिशी करीत होते त्यांना शिवाजी राजांनी सुरनिशीचा हुद्दा सांगितला.
१७ ऑगस्ट १६६०: विजापूरचा आदिलशाह शिवाजीराजे व सिद्दी जौहरचा (गद्दारीच्या संशयाने) नायनाट करण्यासाठी पन्हाळ्याच्या रोखाने ससैन्य निघाला.
१७ ऑगस्ट १६६६: शिवाजी महाराज ९ वर्षांच्या शंभूराजांच्या चाणाक्ष बुद्धी आणि आई भवानीचे आशीर्वाद यामुळे आग्र्यातून पेटाऱ्यातून पसार झाले.
२० ऑगस्ट १६६६: रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार आग्र्यामध्ये फुलौतखानाला सापडले. शिवाजी राजांचे आग्र्याहून सुटकेचे गुढ उकलवून घेण्यासाठी यांचे आनन्वित हाल करण्यात आले. पण त्या स्वामिनिष्ठांच्या मुखातून ‘ब्र’ ही निघाला नाही. बोलले असते तर संभाजी राजे मथुरेतून खासच पकडले गेले असते, व दोघांनाही औरंगजेबाने मालामाल केले असते.
२१ ऑगस्ट १६६१: शिवाजी राजांनी सामराजपंतांच्या जागी नरहरी आनंदराव यांना पेशवाई तर अनाजी दत्तो यांना वाकनिशी दिली. मंत्र्यांना पालख्यांची नेमणूक केली.
२७ ऑगस्ट १६५६: रायगड फत्ते करून शिवाजी राजांनी चंद्रराव मोर्याची मग्रूर गर्दन उडवली.