‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या रिएलिटी शोचे नवीन पर्व दोन आठवड्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आले. या शोचे सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे करते आहे. या शोमध्ये ‘जागर लोकसंगीताचा..’ या भागासाठी मृण्मयीने हा खास ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसवर तिने फोटोशूट केले आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. पारंपारिक ड्रेसला मॉडर्न टच देत मृण्मयी देशपांडेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नाकात नथ, गळ्यात नेकलेस या दागिन्यांनी तिच्या सौंदर्याला चारचाँद लावले. या गेटअपमध्ये मृण्मयी खूपच सुंदर दिसत होती. मृण्मयीच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. मृण्मयी देशपांडे नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारत मृण्मयीने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. मृण्मयीला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा नवरा आहे बिझनेसमॅन, पहिल्याच नजरेत पडला होता तिच्या प्रेमातमृण्मयी देशपांडेच्या हास्यावर आहेत सगळेच फिदा, तिचे हे फोटो पाहून तुम्ही व्हाल खल्लासमृण्मयी देशपांडेची बहीण गौतमी देशपांडेही आहे तिच्या इतकीच सुंदर. पाहा तिचे फोटो