भाग्यश्री मोटे ही मराठी सिनेसृष्टीतील एक बोल्ड अन् बिनधास्त अभिनेत्री. तिचे फोटो नेहमीच लक्ष वेधून घेत असतात.
भाग्यश्री मोटे ही मराठी सिनेसृष्टीतील एक बोल्ड अन् बिनधास्त अभिनेत्री. तिचे फोटो नेहमीच लक्ष वेधून घेत असतात.
आता काय तर भाग्यश्रीनं चाहत्यांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरं लक्ष वेधून घेत आहेत.
होय, अलीकडे भाग्यश्रीनं खास चाहत्यांसाठी आस्क मी एनिथिंग्स हे लाईव्ह सेशन केले. यावेळी चाहत्यांच्या प्रश्नांना तिनं एकापेक्षा एक भन्नाट उत्तरं दिलीत.
तुला मराठीत काम करायला आवडतं की हिंदीत? यावर भाग्यश्रीने एकदम जबरदस्त उत्तर दिलं. मुझे कुए से प्यार है, असं तिनं लिहिलं. अर्थात मला मराठीत काम करायला जास्त आवडतं, असं तिनं सांगितलं.
बिग बॉसमध्ये जाण्याची संधी मिळाली तर? यावर, तर तुम्ही मला तिथे पाहाल, असे मजेशीर उत्तर तिनं दिलं.
लग्न झालं आहे का? अन झालं नसेल तर पार्टनर कसा हवा? असा प्रश्न एका चाहत्यानं केला. यावर, मी माझ्या कामासोबत लग्न केलंय आणि खूश आहे, असं उत्तर देत तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट ‘काय रे रास्कला’ या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले.
यानंतर ती ‘माझ्या बायकोचा प्रियकर’, ‘काय रे रास्कला’ अशा चित्रपटात दिसली होती. भाग्यश्रीने तेलगू चित्रपट ‘चिकती गदीलो चिताकोटुडू’ या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे.