मराठी इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर नाव कमावणारी अभिनेत्री अमृता खानविलकरचा आज वाढदिवस आहे. तिचा जन्म 23 नोव्हेंबर 1984 रोजी पुण्यामध्ये झाला.

मराठी इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर नाव कमावणारी अभिनेत्री अमृता खानविलकरचा आज वाढदिवस आहे. तिचा जन्म 23 नोव्हेंबर 1984 रोजी पुण्यामध्ये झाला.

2004 साली इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज या कार्यक्रमातून तिची सिनेसृष्टीशी पहिली ओळख झाली आणि पुढे तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

24 जानेवारी 2015 रोजी अमृताने हिमांशू मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली.

लग्नाआधी जवळजवळ 9 वर्षे अमृता व हिमांशू रिलेशनशिपमध्ये होते.

इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज या शोच्या सेटवरच अमृता व हिमांशू एकमेकांना भेटले होते.

हिमांशू पंजाबी आहे तर अमृता मराठी. दोघांचेही एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम आहे.

नऊ वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर अमृता बॉयफ्रेंड हिमांशुसोबत लग्नाचा निर्णय घेतला होता.

पण या परफेक्ट लव्हस्टोरीमागचा एक किस्सा कदाचित तुम्हाला माहित नसेल.

‘नच बलिये 9’च्या सेटवर खुद्द हिमांशूने हा किस्सा सांगितला होता.

या शोच्या कन्फेशन राऊंडदरम्यान प्रत्येक जोडप्याला एक गोष्ट एकमेकांसमोर स्टेजवर सांगायची होती त्यावेळी हिमांशुने त्यांच्या रिलेशनशीपबद्दल एक खुलासा केला.

तर प्रेमात असताना आणि एकमेकांना डेट करत असताना इतर जोडप्यांप्रमाणे अमृता व हिमांशू यांच्यातही रूसवे-फुगवे होत.

पण एकदा इतक्या कडाक्याचे भांडण झाले की, अमृताने हिमांशुसोबतचे रिलेशनशीप तोडले आणि ती दुस-या मुलाला डेट करु लागली.

अर्थात हिमांशूला विसरणे इतके सोपे नव्हते.

हिमांशूच्या आठवणीने अमृता इतकी बेजार झाली की, ते रिलेशनशीप सोडून ती पुन्हा हिमांशुकडे आली होती.

आता अमृता पुन्हा आपल्याकडे आली म्हटल्यावर हिमांशू तिला जळवणारच.

मग काय, तिला जळवण्यासाठी हिमांशुने दुस-या मुलीला किस केले होते.

त्यावेळी तो इतका मोठा इश्यू होईल असे वाटले नव्हते. पण यानंतर अमृता पुन्हा रागावली.

तिची समजूत घालता घालता हिमांशूला काय काय करावे लागले असेन, याची कल्पना तुम्ही करू शकताच.

अमृता खानविलकर जशी उत्तम अभिनेत्री आहे तसाच ती सुंदर डान्सही करते.

नच बलिये, एकापेक्षा एक अशा शोमधून तिने आपल्या डान्सचा जलवा दाखवला आहे.

तर कॉमेडी एक्स्प्रेस, बॉलिवूड टूनाईट या कार्यक्रमांचे तिने सूत्रसंचालन केले आहे.