मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक लग्नबेडीत अडकली. बॉक्सर प्रदीप खरेराशी तिने लग्नगाठ बांधली. आज मानसीचा वाढदिवस.
मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक लग्नबेडीत अडकली. बॉक्सर प्रदीप खरेराशी तिने लग्नगाठ बांधली. आज मानसीचा वाढदिवस.
लग्नानंतर मानसी आपला पहिला वाढदिवस साजरा करते आहे. साहजिकचा हा वाढदिवस तिच्यासाठी खास आहे. तशीच मानसी व प्रदीपची लव्हस्टोरीही खास आहे.
फेबु्रवारी 2020 मध्ये मानसीने प्रदीपसोबतचे नाते जगजाहिर केले होते. यानंतर नोव्हेंबर 2020 ला या कपलचा साखरपुडा पार पडला होता.
गेल्यावर्षी वाढदिवसाच्या दुस-याच दिवशी मानसीने प्रेमात असल्याची कबुली दिली होती.
प्रदीपचा प्रेमळ, विश्वासू आणि कमिटेड स्वभावावर मानसी भाळली होती. त्याच्या याच गुणांमुळे मानसीने त्याला आयुष्यभराचा जोडीदार म्हणून निवडले.
मानसी नाईक मराठी सुपर डांसर व अभिनेत्री आहे. प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे.
प्रदीप खरेरा हा स्पोर्ट्समनसह अभिनय व मॉडलिंग चे काम देखील करतो. तसेच तो सोशल मीडियावर देखील खुप अ‍ॅक्टिव्ह असतो. त्याचे अनेक चाहते आहेत.
मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेन्ट 2018 चा विजेता असलेला प्रदीप खरेरा आणि मानसी नाईक वर्षभर रिलेशनशिपमध्ये होते. काही दिवसांपूर्वीच दोघांनी लग्नगाठ बांधली.
अगदी पारंपारिक पद्धतीनं मानसी-प्रदीपचे लग्न झाले. त्यांच्या लग्नाआधीच्या सोहळ्यापासून लग्नानंतरचे बरेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले.
लग्नानंतर मानसी सासरी हरयाणात गेली आहे. लग्नानंतरही आपली पर्सनल लाइफ ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करते आहे.