नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे.

नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे.

प्रिया बापटचा आज वाढदिवस असून तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावरही बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे.

ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.

‘काकस्पर्श’, ‘टाईमपास-२’, ‘टाईम प्लीज’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘वजनदार’ या मराठी चित्रपटांबरोबरच ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले.

हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसली होती.

सध्या रसिकांच्या विशेष पंसतीस पडत असलेले ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाच्या माध्यमातून उमेश कामतसोबत प्रियाने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.

प्रिया व उमेश ही लाडकी जोडी ‘आणि काय हवं’ या वेबसिरीजमध्ये एकत्र झळकली होती.

या 2013 साली ‘टाईम प्लिज’ सिनेमात उमेश आणि प्रिया एकत्र दिसले होते.

प्रिया व उमेश सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत असतात.

त्यांच्या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत असते.