मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा आज 33वा वाढदिवस आहे. (Photo Instagram)
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा आज 33वा वाढदिवस आहे. (Photo Instagram)
सोनाली कुलकर्णी हिचा जन्म 18 मे 1988 रोजी पुण्यातील लष्करी छावणीमध्ये झाला. तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात 30 वर्षे काम केल आहे. तिची आई सविंदर ही पंजाबी असल्यामुळे तिच्या बोलण्यातून या भाषेचा ठेहराव दिसतो. (Photo Instagram)
सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालयात झाले असून माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले आहे. तिने पु्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पत्रकारिता विषयातील पदवी प्राप्त केली आहे. पुण्याच्याच इंदिरा स्कूल ऑफ मॅनेजमेंट ह्या संस्थेतून तिने पत्रकारितेमधील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. (Photo Instagram)
गेल्या वर्षी सोनाली आणि कुणाल बेनोडेकरचा साखरपुडा झाला आहे. (Photo Instagram)
सोनाली तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यामतून ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (Photo Instagram)
सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सोनालीला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘नटरंग’ या चित्रपटातून. या चित्रपटात तिने केलेले लावणीनृत्य प्रचंड गाजले. (Photo Instagram)
त्यातील ‘अप्सरा आली’ या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले. (Photo Instagram)
यानंतर तिने क्षणभर विश्रांती, अजिंठा(चित्रपट) आणि झपाटलेला 2 यांसारखे अनेक चित्रपट केले.(Photo Instagram)
सोनालीने मराठीसोबत हिंदी चित्रप (Photo Instagram)टातही काम केले. ग्रँड मस्ती ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला व रितेश देशमुखच्या पत्नी ममताची भूमिका केली. .(Photo Instagram)
गाढवाचं लग्न, आबा झिंदाबाद, हाय काय नाय काय, समुद्र, सा सासूचा, इरादा पक्का, गोष्ट लग्नाची, नटरंग, अजिंठा, झपाटलेला 2, रमा माधव, क्लासमेट्स, मितवा यासारख्या सिनेमांमध्ये ती झळकली होती. .(Photo Instagram
याशिवाय शटर, पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, तुला कळणार नाही, हम्पी, ती आणि ती, हिरकणी, विकी वेलिंगकर या चित्रपटात सोनालीने काम केले आहे. .(Photo Instagram)
लवकरच तिचा झिम्मा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.कोरोनामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे..(Photo Instagram)
छत्रपती ताराराणी’ आणि फ्रेश लाईम सोडा हे दोन सिनेमे सुद्धा सोनालीनं साईन केलेत.. ज्याचा फर्स्ट लूक तिनं इंस्टाग्रामवर शेअर करत याबाबत चाहत्यांना माहिती दिलीये. .(Photo Instagram)
सोनाली कुलकर्णी शेवटची धुरळा चित्रपटात झळकली होती..(Photo Instagram)
No Text