२०१५ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट 'बुगडी माझी सांडली गं'मधून मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री मानसी मोघे हिने पदार्पण केलं.
२०१५ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘बुगडी माझी सांडली गं’मधून मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री मानसी मोघे हिने पदार्पण केलं.
या चित्रपटानंतर ती २०१६ साली आणखीन एका मराठी चित्रपटात झळकली. त्यानंतर ती मराठी सिनेसृष्टीत काम करताना दिसली नाही.
मात्र सध्या ती मॉडेलिंग करत असल्याचं समजतंय आणि तेही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून.
तसेच ती लवकरच वूटवरील ख्वाबों के परिंदे या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.
मानसी सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे वेगवेगळ्या अदांमधील फोटो पहायला मिळतात.
नुकतेच मानसीने लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते.
फॅशनच्या जगात महत्त्वाचा समजला जाणारा मिस दिवा २०१३चा किताब मानसी मोघेने मिळवला.
तसेच मानसीनं रशियात पार पडलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारातचे प्रतिनिधीत्व केले होते. या स्पर्धेत ती टॉप १०मध्ये होती.
मानसीनं २०१५ साली अभिनय क्षेत्रात मराठी चित्रपटसृष्टीतून पदार्पण केलं. ती बुगडी माझी सांडली गं या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली होती.
तिच्यासोबत अभिनेता कश्यप परूळेकर मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट लावणीप्रधान होता आणि या चित्रपटात तिने सात लावण्या केल्या होत्या. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही.
त्यानंतर २०१६ साली ऑटोग्राफ चित्रपटातही ती झळकली होती.
गेल्या दोन वर्षांपासून ती मराठी सिनेसृष्टीतून गायब झाली आहे.
तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे फोटोशूट व मॉडेलिंगचे फोटो पहायला मिळत आहेत.