प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची आपली स्टाईल असते.
प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची आपली स्टाईल असते.
अभिनेत्री मयुरी देशमुखची एक वेगळी स्टाईल आहे.
तिच्या इन्स्टावर नजर टाकली तर तुम्हाला कळेल की अमुकएक फॅशन तिने कधीच फॉलो केलेली नाही.
खुलता कळी खुलेना’ या मालिकेत मयुरीने साकारलेली सरळ साध्या स्वभावाची मानसीला सा-यांची पसंती मिळाली होती.
त्यानंतर ‘लग्नकल्लोळ’ सिनेमातही ती झळकली होती.
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री मयुरी देशमुखनेही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावरही ती बरीच सक्रिय आहे.
आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते.
ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.
सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे.