शिव दिनविशेषशिवाजी महाराजांचा काळातील विशेष तारखा व त्याची माहिती

३ डिसेंबर १६६९: संभाजी राजांच्या वतीने सरसेनापती प्रताप राव गुजर व निराजी रावजी हे २५०० फौजेसह शाहजादा मुअज्जमकडे औरंगाबादेस होते. यांना अटल करा अशी खबर औरंगजेबाने मुअज्जमला फर्मानाद्वारे सोडली. फर्मान पोहोचण्या आधीच ही खबर मुअज्जमला कळली व त्याने या सर्व सरदारांना राजपुत्र व फौजेसकट निघून जाण्याचा सल्ला दिला आणि सर्वांचेच प्राण वाचले.

४ डिसेंबर १६७३: शिवाजी महाराजांनी कारवार जिंकले.

६ डिसेंबर १६६२: सुरतेवर स्वारी करण्यासाठी शिवाजी महाराजांचे राजगडावरून प्रस्थान.

७ डिसेंबर १६६५: नेतोजी पालकरांनी विजापूरकरांकडून फलटण जिंकले.

८ डिसेंबर १६६५: नेतोजी पालकरांनी विजापूरकरांकडून ताथवडा उर्फ संतोषगड जिंकला.

८ डिसेंबर १६७३: शिवाजी महाराजांनी मोगलांकडून बंकापूर जिंकले.

१० डिसेंबर १६६१: नेतोजी पालकर हे सुपे ते परिंडा मोगली परगण्यांत भयानक धुमाकूळ घालत असल्याची खबर शाईस्तेखानाला पुण्यातील लाल महालात समजली.

११ डिसेंबर १६६९: सरसेनापती प्रताप राव गुजर व निराजी रावजी यांना धरण्याविषयीचे फर्मान अखेर आजच्या दिवशी मुअज्जमला मिळाले. ३ डिसेंबर १६६९ रोजी सगळे जण पळाले होते. त्याप्रमाणे मुअज्जमने औरंगजेबाला लिहून पाठवले की, सगळे जण पळाले. हाजिर असते तर कैद केले असते. याच घटनेनंतर शिवाजी महाराज व औरंगजेब यांच्यातील तह आधिकृतरित्या मोडला.

१३ डिसेंबर १६७८: संभाजी राजे सज्जनगडावरून पळाले व थेट दिलेरखानास जाऊन मिळाले.

१६ डिसेंबर १६६५: नेतोजी पालकरांनी विजापूरकरांकडून खटाव हे ठाणे जिंकले.

१८ डिसेंबर १६६५: नेतोजी पालकरांनी विजापूरकरांकडून मंगळवेढ्याचा किल्ला जिंकला.

२४ डिसेंबर १६६५: दिलेरखान, मिर्झा राजे जयसिंह व शिवाजी महाराज यांच्या संयुक्त आघाडीची (मोगलांची) विजापूरकरांशी लढाई झाली. यात मोगलांचा पराभव झाला.

२८ डिसेंबर १६५९: मिरजे नजिक शिवाजी राजांनी रूस्तुमेजमान व फाजलखान यांचा सणसणीत पराभव केला.

२८ डिसेंबर १६७८: छत्रपति शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक मंत्री दत्ताजी पंत वाकनिस हे मृत्यू पावले.

३१ डिसेंबर १६६३: शिवाजी महाराज सुरत मारायला ६ डिसेंबरला राजगडावरून निघाले. वाटेत ३१ डिसेंबर रोजी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे महापूजा व दान धर्म केला. हा त्यांच्या आचार शिल – विचार शिल – दान शिल – धर्म शिल अशा स्वभावाचा व दिनचर्येचा भाग होता. ३१ डिसेंबर निमित्त ख्रिस्ती ‘हॅपि न्यू इयर सेलिब्रेशन’ चा विषय नव्हता, हे समजाऊन घेतले पाहिजे. शिवाजी महाराजांचे नववर्ष हे गुढी पाडव्यालाच सुरू होत असे.