मराठमोळी अभिनेत्री दिपाली सय्यदने बऱ्याच हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये काम केले आहे.
अभिनयाशिवाय तिने राजकारणातही प्रवेश केला आहे.
दिपाली सय्यदचा सिनेइंडस्ट्रीतील प्रवास मालिकेतून सुरू झाला.
बंदिनी, समांतर या तिच्या कारकीर्दीच्या सुरूवातीच्या मालिका आहेत.
त्यानंतर अनेक मालिका, चित्रपट, नाटक व शोज, जाहिरातीमधून ती झळकली
दिपाली जाऊ तिथे खाऊ, चश्मेबहाद्दूर, लग्नाची वरात लंडनच्या दारात या चित्रपटातील भूमिकांसाठी ओळखल्या जाते.
मात्र खऱ्या अर्थाने ओळख जत्रा सिनेमातील ये गो ये मैना या गाण्यातून तिला मिळाली.
करायला गेलो एक, लाडी गोडी, होऊन जाऊ दे, मला एक चानस हवा, ढोलकीच्या तालावर, वेलकम टू जंगल, उचला रे उचला व मुंबईचा डब्बेवाला या चित्रपटात त्यांनी काम केले.