मानसीच्या लग्नविधींना दोन दिवसांपूर्वीच सुरुवात झाली असून गृहमुखपूजाही करण्यात आली.
मानसीच्या लग्नविधींना दोन दिवसांपूर्वीच सुरुवात झाली असून गृहमुखपूजाही करण्यात आली.
मानसीच्या लग्नाच्या निमित्ताने दिपाली सैय्यदचे सौज्वळ सौंदर्य साऱ्यांनी पुन्हा एकदा अनुभवला.
लाल रंगाच्या लेंहगा त्यावर साजेसा ब्लाऊज परिधान केला होता. तिचा हा अंदाज भलताच भाव खाऊन गेला.
तिचा हा अंदाज, अदा आणि सौंदर्य पाहून चाहतेही नक्कीच घायाळ होतील.
काही दिवसांपूर्वी मानसी नाईकने बॅचलर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
जवळची मैत्रीण म्हणजेच अभिनेत्री दिपाली सय्यदने तिच्यासोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या.
आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिका तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत. या भूमिकांमुळे तिने रसिकांची मने जिंकली आहेत.
दिपाली सय्यदने बऱ्याच हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये काम केले आहे.
दिपाली सय्यदचा सिनेइंडस्ट्रीतील प्रवास मालिकेतून सुरू झाला.
‘बंदिनी’, ‘समांतर’ या तिच्या कारकीर्दीच्या सुरूवातीच्या मालिका आहेत.
31 मे, 2008 साली दिपाली यांनी दिग्दर्शक बॉबी खान यांच्यासोबत लग्न केले आहे.