मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा उर्फ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा उर्फ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

नुकतेच सोनालीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे.

सोनालीने या फोटोत आकाशी रंगाचा गाऊन परिधान केला असून त्यावर ट्रान्सपरंट हाय हिल्सचे सँडल घातले आहेत.

तिने हा लूक सोनाली डान्सिंग क्वीनच्या प्रोमो शूटसाठी केला आहे.

सोनालीने या फोटोंमधून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोनालीच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतो आहे.

लॉकडाऊन काळात सोनाली दुबईतच अडकली होती. दुबईत होणारा पती कुणाल बेनोडेकरसोबत काही महिने राहिल्यानंतर सोनाली नुकतीच मुंबईला परतली.

मुंबईत आल्यानंतर सोनाली पुन्हा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झाली आहे.

मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे.

सोनाली शेवटची धुरळा चित्रपटात झळकली होती.

या चित्रपटात तिच्यासोबत अमेय वाघ, सई ताम्हणकर हे कलाकार होते.

याशिवाय तिने तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.

No Text