कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन जाहीर केल्यामुळे सगळे कलाकार घरात कैद आहेत.
त्यामुळे सेलिब्रेटी सोशल मीडियावर एक्टिव्ह झाले आहेत.
तसेच कुणी घरात राहून आपले छंद जोपासत आहेत तर कुणी कुकिंग करत आहे.
मराठी अभिनेत्री अदिती येवले तर सध्या सोशल मीडियावर कुकिंगचे धडे देत आहे.
अदिती येवले देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे, विविध पदार्थांच्या रेसिपी ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून चाहत्यांना शेअर करताना दिसते
अदितीला अभिनयाबरोबरच विविध रेसिपी बनवायला आवडतात.
अदितीने रुंजी, एक नंबर, कुलस्वामिनी अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
No Text
तसेच वेलकम जिंदगी, विकून टाक या चित्रपटांमधून देखील तिने आजवर महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
शेवटची ती नेबर्स या सिनेमात पहायला मिळाली.
या चित्रपटात तिच्यासोबत कृतिका गायकवाड व चेतन चिटणीस मुख्य भूमिकेत होते.