No Text
No Text
मानसी नाईकच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावून नवविवाहित दाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
थाटामाटात या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. दोघांच्याही लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लग्नसोहळ्यामध्ये मानसीची खास मैत्रिण अभिनेत्री दिपाली सय्यदनेच सा-यांचे लक्ष वेधून घेतले.
लग्न पार पडताच दिपालीला नववधू रुपात मानसीला पाहून ती भावूक झाली होती.
लग्नात मानसीने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता, तर प्रदीपनेही तिला मॅचिंग कपडे परिधान केले होते.
विशेष म्हणजे मानसी नाईक ही ‘जोधा अकबर’मधील ऐश्वर्यासारखीच भासत होती.
नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय.
लग्नाच्या एक दिवसापूर्वीच मानसी नाईकची संगीत सेरमनी पार पाडली. या संगीत सेरमनीला मानसीने तिच्या कुटुंबियांसोबत ताल धरला.
मुंबईत या दोघांचे लग्न महाराष्ट्रीय पद्धतीने पार पडले.आता ते दोघेही प्रदीपच्या मूळ गावी फरिदाबादला रवाना होणार आहेत.
प्रदीपच्या घरी फरिदाबादला काही विधी पार पडणार आहेत.