परशा आर्ची आली आर्ची... हा डायलॉग कानावर जरी पडला तरी ‘सैराट’ चित्रपटातील सीन डोळ्यासमोर उभा राहतो.

परशा आर्ची आली आर्ची… हा डायलॉग कानावर जरी पडला तरी ‘सैराट’ चित्रपटातील सीन डोळ्यासमोर उभा राहतो.

‘सैराट’ने व त्यातील परशा आणि आर्ची यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. म्हणायला ‘सैराट’ रिलीज होऊन पाच वर्षे उलटलीत पण आजही आर्ची व परशा या नावांची जादू कायम आहे.


आकाशने नुकतेच त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत आणि चाहते ‘सैराट’ झालेत.

आकाशचे फेस अ‍ॅपमध्ये एडिट केलेले फोटो आहेत. अ‍ॅपच्या मदतीने आकाशने त्याचे फिमेल लूकमधील फोटो बनवलेत आणि तेच सोशल मीडियावर शेअर केलेत.

गेल्या काही दिवसांपासून स्त्रियांचा मेल लूक आणि पुरूषांचा फिमेल लूक कसा दिसेल, हे जाणून घेण्याचा ट्रेंड आला आहे. 

अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमचा लूक बदलू शकता. आकाशलाही याच अ‍ॅपच्या मदतीने स्वत:चे फिमेल लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

परशा उर्फ आकाश ठोसरचा जन्म त्याच्या मुळ गावी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे २४ फेब्रुवारी १९९३ रोजी एका सामान्य कुटूंबात झाला. 


सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी आकाश पैलवान होता.