अभिनयाने रसिकांवर जादू करणारी तृप्ती फिटनेसबाबतही काटेकोर आणि सजग आहे. ती नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही. याआधीही विविध फोटोशूटमधून तृप्तीने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे तृप्तीचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. नेहमीच तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंंटसचा वर्षाव होत असतो. मराठमोळ्या या अभिनेत्रीचा बोल्डनेस पाहून विसराल बॉलिवूडच्या मलायका आणि करीनाला, पहा तिचे फोटोमराठमोळ्या अभिनेत्रींनी स्वीकारले ‘Black and White’ चॅलेंज, पाहा फोटोGanesh Festival 2021: मराठी सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा आला… पाहा फोटो