1. गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु
गुरुदेवो महेश्वर:
गुरु साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
2. ज्यांनी मला घडवलंय
जगात लढायला, जगायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे!
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
3. गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया|..
जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई,
शहाणे करून सोडी, सकळ जना..
तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..
आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
4. गुरुने दिला ज्ञानरुपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
5. आदी गुरुसी वंदावे |
मग साधनं साधावे||गुरु म्हणजे माय बापं |
नाम घेता हरतील पाप||
गुरु म्हणजे आहे काशी |
साती तिर्थ तया पाशी||तुका म्हणे ऐंसे गुरु |
चरणं त्याचे ह्रदयीं धरू||
6. गुरु हा संतकुळीचा राजा।
गुरु हा प्राणविसावा माझा।
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
7. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
8. आज गुरुपौर्णिमा”
ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा,
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो..
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
9.“आज गुरुपौर्णिमा”
माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन, माझे बंधू, माझी पत्नी, माझी मुले तसेच,
माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन
व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक,
समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत…
आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले,
सर्वांचे धन्यवाद!
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा…
जय गुरुदेव दत्त!
10. योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता
खोटे काय, खरे काय ते आपण समजावता
जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा