वेबविश्वासह मिथिलाचे अनेक फॅन्स निर्माण झालेत. तिच्या टॅलेंटचे कौतुक तर सा-यांनीच केले. मात्र मिथिलाच्या स्टायलिश लूकचेही विशेष कौतुक होत असते. बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाजात नेहमीच मिथिला चाहत्यांना तिच्या लूकने भुरळ पाडत असते. अभिनेत्री मिथिला पालकरने तिच्या दमदार अभिनयासह आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाने रसिकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही रसिकांशी संवाद साधत असते. इथे ती आपले नवनवे फोटो फॅन्ससह शेअरही करत असते. नुकतंच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोतील तिचा ग्लॅमरस लूक कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती वेगवेगळ्या ड्रेसमध्ये आपल्या सौंदर्याची जादू दाखवत असते. तिच्या या फोटोला खूप सारी पसंती मिळत आहे. या फोटोवर तिच्या फॅन्सकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.