अभिनेत्री रुचिता जाधवच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच रुचिता लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं होतं. व्यावसायिक आनंद मानेशी लग्न करणार असल्याचे तिने सांगितले होते. त्यामागोमागच आता तिच्या लग्नसोहळ्यापूर्वीच्या विधींना सुरुवात झाल्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये नुकतीच ग्रहमुख पूजा झाल्याचं फोटोत पाहायला मिळतंय. लग्नाआधीच्या या विधींमध्ये रुचिता अतिशय आनंदी दिसत असून कुटुंबासह ती पूजा करताना पाहायला मिळतेय. नवराई असलेलली रुचिता ही तिच्या पेहरावात एकदम सुंदर दिसते आहे. येत्या काळात या जोडीचे आणि त्यांच्या मंगल कार्याचे व्हिडीओज आणि फोटोज चाहत्यांच्या भेटीस येतीलच. रुचिताच्या चाहते तिच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. पंचगणी येथील एका फार्महाऊसवर तिचे लग्न होणार आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडणार आहे. मराठी कलाकारांनी असा साजरा केला गुढीपाडवा, पहा त्यांचे फोटोअभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याने केले सुसाइड, मराठी सिनेइंडस्ट्रीत माजली खळबळ, पहा त्यांचे फोटोअभिनेत्री गौतमी देशपांडे हे ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल तिच्या अदांवर फिदा!