अभिनेत्री नेहा महाजनने ‘कॉफी अँड बरेच काही’, ‘निळकंठ मास्तर’ ‘वन वे तिकिट’ यांसारख्या मराठी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मराठीसोबतच ती तमीळ आणि इंग्रजी चित्रपटात देखील झळकली होती. मराठी इंडस्ट्रीत नेहा महाजनला सगळ्यात बोल्ड अभिनेत्री समजले जाते. सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असून ती याद्वारे तिच्या प्रोजेक्टविषयी माहिती देत असते. तसेच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. २०१६ मध्ये नेहाचा एका न्युड एमएमएस व्हायरल झाला होता. याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. तिने ‘द पेंटेड हाऊस’ या एका मल्याळम चित्रपटासाठी न्यूड सीन्स दिले होते आणि या चित्रपटाच्या कथेची ती गरज होती असे तिने स्पष्टीकरणही दिले होते. नेहाच्या या एमएमएसमुळे केवळ मराठी चित्रपटसृष्टीत नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील नेहाच्या नावाची चांगलीच चर्चा रंगली होती. नेहाचा जन्म हा भारतातील असला तरी नेहाने युएसएमधील टेक्सास येथील ट्रिंबल टेक हायस्कूलमध्ये अभिनयाचे धडे गिरवले आहेत. प्रसिद्ध सतारवादक पंडित विदुर महाजन तिचे वडील असून तिने वडिलांकडून सतारचे धडे देखील गिरवले आहे. No Text मराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..!, एकदा पहा तिच्या ग्लॅमरस अदा, See Photosसुंदरा…मनामध्ये भरली! नेहा पेंडसेच्या एथनिक ड्रेसमधील अदांनी चाहत्यांना पाडली भुरळअभिनेत्री नेहा पेंडसे यांचा डॅशिंग साडी लुक तुम्ही पाहिलात का ?