आज 21 जून आजचा दिवस संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. सेलिब्रिटींनी यानिमित्ताने योगा करतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री कृतिका गायकवाड (Krutika Gaikwad) त्यापैकीच एक.

होय, सध्या तिचे योग करतानाचे फोटो चर्चेचा विषय ठरले आहेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कृतिकाने चक्क मुंबईच्या रस्त्यावर योगा केला.
याचे अनेक फोटो व व्हिडीओ कृतिकाने शेअर केले आहेत. यात ती हॉट योगा करताना दिसतेय.
मुंबईची गोष्टच न्यारी…, असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे. तिच्या या फोटोंवर सध्या चाहते लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
युवा डान्स क्चीनमध्ये झळकलेली कृतिका तिच्या हटके स्टाईल व अनोख्या फोटोशूटसाठी ओळखली जाते.
लॉकडाऊनच्या काळात कृतिकाने कमोडवर बसून फोटोशूट केले होते. शिवाय वर्तमानपत्राचा ड्रेस घालून केलेल्या तिच्या फोटोशूटचीही बरीच चर्चा झाली होती.
बंदीशाळा या सिनेमात कृतिका झळकली होती. या चित्रपटातील तिच्या ठसकेबाज लावणीने सर्वांचे लक्ष वेधले होते.
विठ्ठलाशपथ, आशियाना या मालिकांमध्येही ती झळकली होती.
कृतिकाच्या या फोटोंवर सध्या चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.