जुई गडकरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने तिचे रेट्रो लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
जुई गडकरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने तिचे रेट्रो लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
जुईचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असल्याचे ते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.
जुई गडकरी ‘पुढचं पाऊल’ मालिकेतील सोज्वळ सूनेच्या भूमिकेतून घराघरात पोहचली. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली.
त्यानंतर ती ‘सरस्वती’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.
मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात ती सहभागी झाली होती. या शोमधून तिने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. जवळपास ती दोन महिने बिग बॉसच्या घरात होती.
या शोमधून बाहेर पडल्यानंतर ती युरोप टूरवर मोठ्या कालावधीसाठी गेली होती.
जुई गडकरीने बिग बॉसनंतर वर्तुळ या मालिकेत काम केले होते.
जुई सोशल मीडियाद्वारे समाजातील प्रश्नांवर आपले मत व्यक्त करत असते.
जुईला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे.
जुईच्या अभिनयाप्रमाणे तिच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा रंगते.