सुरुची आडारकर ‘का रे दुरावा’, ‘अंजली’ या मालिकेतून घराघरात पोहचली आहे.
सुरुची आडारकर ‘का रे दुरावा’, ‘अंजली’ या मालिकेतून घराघरात पोहचली आहे.
सुरुचीने प्रेक्षकांना विविध भूमिकेतून चांगलीच भुरळ पाडली आहे.
सुरुचीने ग्लॅमरस फोटोशूट केलं असून यामध्ये तिचा नवा अंदाज पाहायला मिळत आहे.
सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये सुरुची खुलून दिसते आहे.
सुरुचीने ‘एक घर मंतरलेलं’ या मालिकेत पत्रकाराची भूमिका साकारली होती.
सुयश टिळक आणि सुरुची यांच्यातील केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
२००७ मध्ये सुरुचीने सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं.
‘अवघा रंग एकची झाला’ या नाटकातून तिने पदार्पण केलं.
त्यानंतर तिने बऱ्याच मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.
‘का रे दुरावा’, ‘आपलं बुआ असं आहे’, ‘ओळख’, ‘एक तास भुताचा’ आणि ‘पहचान’ या मालिकांमध्ये सुरूची विविध भूमिकांमध्ये दिसली.
सुरुचीने ‘तथास्तू’ या हिंदी चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती. या चित्रपटात संजय दत्त मुख्य भूमिकेत होता.