किशोरी शहाणे यांचा आज वाढदिवस असून त्यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील त्यांची ओळख निर्माण केली आहे.
किशोरी शहाणे यांचा आज वाढदिवस असून त्यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील त्यांची ओळख निर्माण केली आहे.
किशोरी शहाणे यांचे लग्न प्रसिद्ध दिग्दर्शक दिपक बलराज वीज यांच्यासोबत झाले असून दिपक यांनी जान तेरा नाम या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
दीपक हे प्रसिद्ध दिग्‍दर्शक आणि लेखक आहेत. त्‍यांनी २२ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
त्यांच्या प्रेमकथेविषयी किशोरी सांगतात, दिपकने दिग्दर्शित केलेल्या ‘हफ्ता बंद’मध्‍ये जॅकी श्रॉफ हिरो होता. त्याचवेळी माझे एका मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. जॅकीची आणि माझी ओळख खूप जुनी आहे. तो महाकाली येथील होली स्पिरिट हॉस्पिटलमध्‍ये चित्रपटाचे चित्रीकरण करायला यायचा. तिथे आम्ही एक फॅन म्हणून त्याची ऑटोग्राफ घ्यायला, त्याला भेटायला जायचो. अनेक भेटीनंतर आमची खूप चांगली मैत्री झाली. तेव्‍हा तो मला म्‍हणाला ‘एक डायरेक्‍टर है… उनको फिल्म के लिये मराठी ॲक्‍ट्रेस चाहिये…’ त्यामुळे जॅकीने माझी ओळख करून दीपक सोबत करून दिली.”
पुढे किशोरी सांगतात, ”दीपक यांनी मला ‘हफ्ता बंद’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आमची मैत्री झाली. तेव्‍हा फोन म्‍हणजे लँडलाइन असायचे. आम्ही रात्र-रात्रभर फोनवर बोलायचो. घरातल्यांना कळू नये म्हणून मी लपून छपून फोनवर बोलायचे. त्यानंतर काहीच वर्षांत आमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पण सुरुवातीला एक-दोन वर्षं आमच्यात केवळ मैत्री होती.”
किशोरी पुढे सांगतात, हफ्ता बंद या चित्रपटानंतर दीपक यांनी मला ‘बॉम्‍ब ब्‍लास्‍ट’ या चित्रपटात घेतले. पण आमच्या नात्‍याबाबत आईवडिलांना समजल्‍यामुळे परिस्थिती काहीशी गंभीर झाली. मात्र काहीच महिन्यात त्यांनी देखील आमच्या नात्यासाठी होकार दिला आणि आम्ही लग्न केले.
किशोरी यांनी त्यांची ही प्रेमकथा बिग बॉस मराठी या कार्यक्रमात सांगितली होती.
किशोरी आणि दिपक एकमेकांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
किशोरी आणि दिपक यांना मुलगा असून तो लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे.
किशोरी आणि दिपक लॉकडाऊनमुळे आज किशोरी यांच्या वाढदिवसाला एकमेकांना भेटू शकलेले नाहीत. पण दिपक यांनी किशोरी यांच्यासाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.