खेड्यामधले घर कौलारू . This song is sung by Asha Bhosle. Its music is composed by Sudhir Phadke. And the lyrics are penned by G. D. Madgulkar.

खेड्यामधले घर कौलारू Lyrics (Marathi)

आठवणींच्या आधी जाते
तिथे मनाचे निळे पाखरू
खेड्यामधले घर कौलारू !

हिरवी श्यामल भवती शेती
पाऊलवाटा अंगणि मिळती
लव फुलवंती, जुइ शेवंती
शेंदरि अंबा सजे मोहरू !

चौकट तीवर बाल गणपती
चौसोपी खण स्वागत करती
झोपाळ्यावर अभंग कातर
सवे लागती कड्या करकरू !

माजघरातील उजेड मिणमिण
वृद्ध कांकणे करिती किणकिण
किणकिण ती हळु, ये कुरवाळू
दूरदेशिचे प्रौढ लेकरू !

Khedyamadhale Ghar Lyrics Transliteration (English)

Khedyamadhale Ghar Song Information

Khedyamadhale Ghar Song Information

Songखेड्यामधले घर कौलारू – Khedyamadhale Ghar
गीतकार / Lyricistग. दि. माडगूळकर (G. D. Madgulkar)
गायक / Singerआशा भोसले (Asha Bhosle)
संगीतकार / Music Directorसुधीर फडके (Sudhir Phadke)
चित्रपट / Movieऊन पाऊस (१९५४) (Oon Paus (1954))

Khedyamadhale Ghar Video

Khedyamadhale Ghar Video