मानसी नाईकने नुकतेच एक फोटोशूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
मानसी नाईकने नुकतेच एक फोटोशूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
मानसीने हे फोटोशूट चक्क बाथरूममध्ये केले आहे. त्यामुळे या फोटोंची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
मानसीने या फोटोंमध्ये काळ्या रंगाचा वनपीस घातलेला असून तिच्या हातात आपल्याला चुडा पाहायला मिळतोय.
मानसीच्या हातातील चुडा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण हा चुडा खूपच खास आहे.
मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे. मानसी आणि प्रदीप एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
प्रदीप हा उत्तरेकडचा असल्याने तिथल्या प्रदेशांमध्ये लग्न झाल्यानंतर नवविवाहित चुडा आवर्जून घालते.
मानसीने देखील तिथल्या प्रथेप्रमाणे मोठा चुडा घातला आहे. पण तिच्या या चुड्याचे वैशिष्ट्य म्हणजे मानसी आणि प्रदीपचा फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे.
मानसीचा नवरा प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे. प्रदीप त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो.
मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत.
अभिनेत्री मानसी नाईकने प्रदीप खरेराशी लग्न केल्यानंतर ती फरिदाबादला सासरी गेली होती. तिेथले फोटो देखील तिथे सोशल मीडियावर पोस्ट केले होते.