मानसी नाईक प्रदीप खरेरासोबत नात्यात असल्याचे सोशल मीडियाद्वारे तिने सांगितले होते.

मानसी नाईक प्रदीप खरेरासोबत नात्यात असल्याचे सोशल मीडियाद्वारे तिने सांगितले होते.

प्रदीप हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता व मॉडेल आहे.

मानसी आणि प्रदीप कधीपासून प्रेमात आहेत आणि ते एकमेकांना कसे भेटले, हे अद्याप समजलेले नाही.

प्रदीप व मानसी त्यांच्या सोशल मीडियावर नेहमीच त्यांचे फोटो पोस्ट करत असतात.

मानसीने नुकतेच प्रदीपसोबत फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटमध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात पहायला मिळत आहेत.

मानसी व प्रदीप यांची जोडी चाहत्यांना खूप भावते. त्यामुळेच त्यांच्या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.

मानसी व प्रदीप लग्नबेडीत अडकणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मानसी नाईक हिने प्रेक्षकांना आपल्या नृत्याच्या अदांनी घायाळ केले आहे.

‘बघतोय रिक्षावाला’ म्हणत तिने मराठी प्रेक्षकांना आपल्या तालावर डोलायला लावले.

ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅॅॅॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून अभिनेत्री मानसी नाईकच्या रूपाने मराठी इंडस्ट्रीला एक चांगली नृत्यांगना मिळाली आहे.