दोघांच्या आयुष्यात त्यानंतर एका गोंडस परीचं आगमन झालं. तिचं नाव या दोघांनी किशा असं ठेवलं. किशा दोघांच्या जीवनातील अनमोल हिरा आहे. शरद नेहमीच लेकीसोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. बाप लेकीच्या या फोटोंना सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती मिळते. शेअर केलेल्या फोटोत बाप-लेकीचं प्रेमळ नातं पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये बाप-लेकीचे प्रेम तुम्हाला पाहायला मिळेल. शरद लेकीच्या केसांना मस्त मसाज करतान दिसतोय. तर कधी तिच्यासोबत खेळण्यात बिझी दिसतोय. हे पाहून तुम्हीही या फोटोंच्या प्रेमात नक्कीच पडाल. माझी राजकुमारी असं कॅप्शन शरदने या फोटोला दिले आहे.