सोनाली कुलकर्णी- राष्ट्रनिर्मितीसाठी ते झटले,आपण राष्ट्र टिकवण्यासाठी झटूया..हुतात्मे ते झाले,आपण मराठी माणसाला वाचवूया..आज पुन्हा गरज़ आहे एकत्र येण्याची,एकमेकांसाठी,या महाराष्ट्रासाठी,एकजुट होऊया..जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया. #महाराष्ट्रदिन #जयमहाराष्ट्र #माझामहाराष्ट्र
सोनाली कुलकर्णी– राष्ट्रनिर्मितीसाठी ते झटले,आपण राष्ट्र टिकवण्यासाठी झटूया..हुतात्मे ते झाले,आपण मराठी माणसाला वाचवूया..आज पुन्हा गरज़ आहे एकत्र येण्याची,एकमेकांसाठी,या महाराष्ट्रासाठी,एकजुट होऊया..जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया. #महाराष्ट्रदिन #जयमहाराष्ट्र #माझामहाराष्ट्र
अमृता खानविलकर- महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा. संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो वा कामगार लढा, ही आंदोलनं एकजुटीमुळे यशस्वी होऊ शकली. आपल्या देशावर ओढावलेलं संकट हे एका विषाणूविरोधातील आंदोलनच आहे. त्यामुळे या आंदोलनातही आपण एकजूट दाखवली तर आपलीही या विषाणूविरोधातील चळवळ यशस्वी होईल. #महाराष्ट्रदिनाच्याशुभेच्छा !!!
रश्मी आगडेकर-महाराष्ट्र दिवस आमच्या म्हणजेच मराठी माणसांसाठी खूप महत्वाचा मानला जातो, हा दिवस आम्हाला आमच्या मुळांची आठवण करून देतो. मराठी असण्याचा मला खूप अभिमान आहे. तसेच १ मे हा कामगार दिवस सुद्धा मानला जातो, या कोरोनाच्या काळात मी आपल्या फ्रंटलाइन वर्कर्सचे आभार मानते. अशा परिस्थितीतही ते आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्याचे पालन करत आहे. सर्वांना माझ्याकडून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.
नेहा पेंडसे- ”मला महाराष्‍ट्रीयन असण्‍याचा आणि या भूमीमध्‍ये जन्‍म घेतल्‍याचा अभिमान वाटतो. या भूमीमध्‍ये भारताची असंख्‍य संपादने व संपन्‍न इतिहास सामावलेला आहे. राज्‍याचा संपन्‍न सांस्‍कृतिक वारसा आहे आणि राज्‍याचा हा वारसा अनेक किल्‍ले, राजवाडे, गुहा, देवस्‍थान व वस्‍तुसंग्रहालयांमधून दिसून येतो. राज्‍याचे लोकसंगीत, पारंपारिक नृत्‍ये व स्‍वादिष्‍ट पाककला देखील सर्वोत्तम आहेत. मी प्रसिद्ध किल्‍ले व वस्‍तुसंग्रहालयांना भेट देते तेव्‍हा त्‍यामागील ऐतिहासिक महत्त्व जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न करते. प्रत्‍येकवेळी नवीन गोष्‍टी समजल्‍यानंतर माझे मन अभिमानाने भरून जाते. मी आजच्‍या तरूणांना ते राहत असलेल्‍या राज्‍याबाबत व सखोल संस्‍कृतीबाबत अधिक जाणून घेण्‍याचे आवाहन करते. तुम्‍हा सर्वांना महाराष्‍ट्र दिनाच्‍या आनंदमय शुभेच्‍छा
उर्मिला कोठारेनेही महाराष्‍ट्र दिनानिमित्त चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. खास मराठी पारंपरिक अंदाजातले फोटो शेअर करत तिने मंगल देशा. पवित्र देशा. प्रणाम घ्यावा माझा, हे श्री महाराष्ट्र देशा 🚩१ मे. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
नम्रता आवटे संभेराव-गर्व आहे मला मी मराठी असण्याचा❤️ महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा😇
प्रिया बापट- राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा