मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने नुकतेच इंस्टाग्रामवर पिंक एथनिक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

पिंक एथनिक ड्रेसमध्ये नेहा पेंडसेच्या विविध छटा पहायला मिळत आहेत.

नेहाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या ड्रेससोबत तिच्या सोज्वळ अदा आणि कानातील डुलनेदेखील या लूकला चारचाँद लावले आहेत.

नेहा पेंडसेच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

याआधीदेखील नेहाने एथनिक ड्रेसमधील फोटो शेअर केले होते.

नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.

नेहा बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते.

मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.

नेहा जून चित्रपटात झळकणार आहे.

या चित्रपटात नेहासोबत अभिनेता सिद्धार्थ मेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

नेहा पेंडसे ‘सुरज पे मंगल भारी’ या हिंदी चित्रपटात झळकणार आहे.