अभिनेत्री रुपाली भोसले सध्या तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. नवरात्रोत्सवातील तिचे हे खास फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरते आहे.

अभिनेत्री रुपाली भोसले सध्या तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. नवरात्रोत्सवातील तिचे हे खास फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरते आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रूपालीने दुर्गा अवतारातील फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

नवरात्रोत्सवाचा पहिल्या दिवसाचा रंग राखाडी असल्याने तिने त्याच रंगाची साडी परिधान केली होती.

नवरात्रीच्या शुभेच्छा. देवी दुर्गेची शक्ती प्रत्येक महिलेत असते, असे तिने लिहिले होते.

दुस-या दिवसाचा रंग नारंगी असल्याने तिने यादिवशी ती याच रंगात कालीच्या अवतारात दिसली होती.

रूपालीचा हा फोटो पाहून सगळ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. रुपालीच्या या गेटअपसाठी कॉश्च्युम आणि स्टाइल बेन्झ फॅशन (तान्या)ने केली आहे. मेकअप मनिषा कोलगेने केला आहे.

तिचा हा अवतार राहुल महाडीकने आपल्या कॅमे-यात कैद केला आहे. लाइट्सची जबाबदारी अभि वरे याने तर अमोल जाधवने पेलली आहे.

तिस-या दिवशीचा रंग पांढरा असल्याने तिने या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले होते.

नवरात्री म्हणजे नऊ दिवसांचा उत्सव. त्यामुळे या नऊ दिवसांत रूपाली वेगवेगळ्या रंगातील पेहरावातील सृजनशील फोटो शेअर करत राहणार आहे.

तूर्तास रुपाली भोसलेच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. रुपाली सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो शेअर करत असते.