अभिनेत्री सायली संजीव सोशल मीडियावर सायली खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते. आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ते चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साडीतला फोटो शेअर केले आहेत. साडी आणि गजऱ्याने सायलीच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. तिच्या फॉलोवर्सनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत गौरीची भूमिका साकारणाऱ्या सायली संजीवने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे सायली संजीव हे नाव आज घराघरात पोहोचले. सायली संजीवने या मालिकेत झळकण्याआधी काही चित्रपटांमध्ये काम केले होते. ‘काहे दिया परदेस’ ही मालिका संपल्यानंतर तिने गुलमोहर या मालिकेत काम केले होते. परफेक्ट पती या हिंदी मालिकेत तिला जया प्रदा सारख्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मिळाली. सायली तिच्या कामाच्या निमित्ताने सध्या मुंबईत राहात असली तरी ती मुळची नाशिकची आहे. सायलीचे बालपण नाशिकमध्ये गेले आहे. ती अभिनेत्री होईल असा तिने कधी विचारदेखील केला नव्हता. साडीत खुललं अभिनेत्री सायली संजीवचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल- कमालहे मराठी स्टार्स नावापुढे लावत नाही आडनाव, काय आहेत या कलाकारांची आडनावं?Ganesh Festival 2021: मराठी सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा आला… पाहा फोटो