मराठमोळी अभिनेत्री रुचिता जाधव नुकतीच आनंद मानेसोबत लग्नबंधनात अडकली आहे. महाबळेश्वरमधील पाचगणी येथील एका फार्महाऊसवर हा विवाह सोहळा पार पडला. कोरोनाच्या नियमांचे पालन करत रुचिताचा कुटुंबाच्या उपस्थित हा विवाहसोहळा पार पाडला आहे. मागील वर्षी लॉकडाऊन दरम्यान रुचिता आणि आनंद याचे हे अरेंज मॅरेज ठरले होते. काहीच दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा पार पडला होता. लव्ह लग्न लोचा या मालिकेमुळे रुचिता घराघरात पोहचली होती. मात्र रुचिताने आपल्या कामाची सुरुवात जाहिरातीमधून केली होती. यातून तिने आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला होता. रुचिता जाधव हिने ‘लव लग्न लोच्या’सह ‘माणूस एक माती’, ‘मनातल्या’ उन्हात अशा चित्रपटांमध्येही काम केले आहे. OMG! सई ताम्हणकरने कॉपी केली संस्कारी बहू श्वेता तिवारीची स्टाईल, पहा फोटोलग्नबंधनात अडकण्यास मराठमोळी अभिनेत्री सज्ज, लग्नापूर्वीच्या विधींना उत्साहात सुरुवातमराठमोळी ही अभिनेत्री आहे सिनेइंडस्ट्रीतून गायब, मेकओव्हरमुळे तिला ओळखणंही झालंय कठीण